Skip to main content

Posts

Showing posts from 2024

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती

■ पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट. ■ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.  ■ मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 31,000 रूपये  ■ अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने  ■ भरती कालावधी : सुरुवातीला सहा (06) महिन्यांसाठी आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे ■ पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता : • ज्युनियर रिसर्च फेलो : M.Sc. जैवतंत्रज्ञान / जैवतंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र/ जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन मध्ये. • फील्ड असिस्टंट : B.Sc. Agri मध्ये. / हॉर्ट. / बी.टेक. बायोटेक / कृषी डिप्लोमा  डेटा एंट्री ऑपरेटर : डिग्री/ डिप्लोमा, एमएससीआयटी, टायपिंग स्पीड (मराठी 30 wps आणि इंग्रजी 40 wps). ■ रिक्त पदे : 03  ■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ■ अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, MPKV, राहुरी ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर पिन – 413722 जाहिरात व अर्ज टाईप करून घेण...

आता आधार कार्डसोबत व्होटिंग कार्ड लिंक गरजेचे, बनावट मतदान रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय.

आता आधार कार्ड सोबत व्होटिंग कार्ड Voting Card Link लिंक करावे लागणार आहे याचा फायदा नक्कीच बोगस मतदान होणे या वर होईल ज्याने जास्तीत जास्त फक्त हयात आणि खरे मतदार एकाच ठिकाणी मतदान करू शकतील ! बनावट मतदान रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय ! आता पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक असले तरी आता मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच मतदान कार्ड असेल, एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मतदान कार्ड असल्यास त्यांची ओळख पटवली जाईल आणि उर्वरित मतदान कार्ड रद्द केले जातील. असा सरकारचा विश्वास आहे. सरकारने या निर्णयाची नोटीस बजावली आहे. देशाचे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी या आधीच आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती ट्विट करून दिली आहे voting card online application in Maharashtra हे लवकरच सुरु होण्याची शक्यता वर्तवली होती पण आता दि ०१ ऑगस्ट २०२२ पासून आपण आपले मतदान कार्ड हे आधार कार्ड ला लिंक (Voting Card Link) करू शकणार आहात  या निर्णयामुळे अनेक बनावट मतदान कार्डांना आळा बसणार आहे. एका वृत्तानुसार, कायद...

आचारसंहिता लागायच्‍या आत लाडक्‍या बहिणींना ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबर चे तीन हजार रुपये येणार

  भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाअजित पवार यांनी केली. महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या महिन्याच्या हफ्त्याची रक्कम जमा होत आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातील परळी येथे होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ही योजना पुढील पाच वर्षे अशीचचालू राहील. तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाहीअजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा काढली आहे. सध्या त्यांचा दौरा मराठवाड्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहि‍णींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहि‍णींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल २ ...

इस्रायलवर इराणचा १८० मिसाईल्‍सचा हल्‍ला, इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा

  इराणने मंगळवारी (1 ऑक्टोबर) उशिरा रात्री इस्रायलच्या दिशेने शेकडो मिसाईल्स डागल्या. यामधील काही मिसाईल्स इस्रायलच्या भूभागावर पडल्या आहेत. यावर्षी इराणने इस्रायलवर केलेला हा दुसरा हल्ला आहे. एप्रिलमध्येही इराणने इस्रायलवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते. इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे हे हल्ले आता थांबले असून सध्या कोणताही धोका नाहीये. मात्र, या हल्ल्यामुळे इस्रायलचं किती नुकसान झालं आहे, त्याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. इस्रायलच्या टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये स्थानिक वेळेनुसार, रात्री पावणेआठच्या (भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी) काही वेळ आधी तेल अव्हीव आणि त्या आसपासच्या परिसरामध्ये आकाशामध्ये काही मिसाईल्स दिसून आल्या. या हल्ल्यादरम्यान काही मिसाईल्स निश्चित ठिकाणी धडकल्या असल्याचं सैन्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सैन्यातील एका प्रवक्त्याने म्हटलं की, हे हल्ले इस्रायलच्या मध्य आणि दक्षिण भागावर झाले आहे. दुसऱ्या बाजूला, इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कोअरचं (आयआरजीसी) म्हणणं आहे की, त्यांच्...

PM किसान योजना नवीन नोंदणी महत्वपूर्ण अपडेट

👇👇👇👇 दिनांक ०१.०२.२०१९ पूर्वीचा फेरफार, १ महिन्याच्या आतील ७/१२ , पती पत्नी आधारकार्ड वारस म्हणून ०१.०२.२०१९ नंतर जमीन आली असेल तर मयतच्या नावाचा ०१.०२.२०१९ पूर्वीचा फेरफार, मयतचा दाखला, वारसाचे नाव आलेचा फेरफार, एक महिन्याच्या आतील ७/१२ व पती पत्नी आधारकार्ड Pm kisan योजनेसाठी वरील प्रमाणे कागदपत्र ऑनलाइन अर्पलोड करणे गरजेचे आहे... यापैकी एक ही कागदपत्र नसेल तर प्रकरण रद्द करण्यात येत आहेत... यापूर्वी जेवढे फॉर्म भरले आहेत ते सर्व रद्द करण्यात येणार आहेत.

लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स

लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा संपली आहे. योजनेचा तिसरा हफ्ता आधार लिंक बँक खात्यात 29 सप्टेंबर रोजी येणार आहे.  रायगड येथे तिसरा हफ्ता वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे परंतु त्यांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांना 4500 रुपये आधार लिंक बँक खात्यात येतील. व ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला आहे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात 1500 रुपये जमा होतील. आणि ज्या महिलांना या अगोदर दोन हफ्ते चे 3000 रुपये आलेले आहेत त्यांना तिसरा हफ्ता 1500 रुपये येतील. पांडे कॉम्प्युटर्स राहुरी 7020529393

सोयाबीन कापूस अनुदान लाभार्थी यादी आली असे चेक करा आपले नाव

सोयाबीन कापूस अनुदानांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे, सदर अनुदानाच्या याद्या आलेल्या असून खालील वेबसाईट वर पाहता येतील  वेबसाईट लिंक https://uatscagridbt.mahaitgov.in/

मोडी लिपीचे ऑनलाईन प्रशिक्षण मोफत घ्या अन् प्रशिक्षण काळात 10,000 स्टायफंडही मिळवा

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्यावतीने मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी 'सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबत विद्यावेतनही मिळणार आहे. निकष काय? उमेदवार भराठी, कुणबी असावा.  महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.  नॉन क्रिमिलेअर असावा. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र असावे. जातीचे प्रमाणपत्र नसल्यास ईडब्ल्यूएस किंवा एसईबीसी प्रमाणपत्र असावे. उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र जोडावे. महिन्याला दहा हजारांचे विद्यावेतन प्रशिक्षण घेणाऱ्या व प्रशिक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी प्रतिमहिना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २ महिन्यांचा ६० ऑनलाइन तासचा हा अभ्यासक्रम आहे. यात मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. अर्जासाठी लागणारी कागदपत्रे-  ओरीजनल आधार कार्ड दहावी मार्कशीट व प्रमाणपत्र बारावी मार्कशीट उत्‍पन्‍नाचा दाखला तहसीलदार यांचा  शाळा सोडल्‍याचा दाखला किंवा टीसी फ...

'या' महिलांना मिळणार नाहीत 3 हजार; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरात चर्चा सुरू आहे. अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टनंतरही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आज दिली. गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, १ सप्टेंबरनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये मिळणार नाही." लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? "आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नाही. यापुढेही अर्ज करता येणार आहेत", असे त्या म्हणाल्या.  लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? "आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक...

लाभदायी विश्वकर्मा योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना  काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ? १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.  योजनेचा उद्देश   योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना ५ टक्के व्याजदरासह पहिल्या टप्यात १ लाख रु.  तर दुसऱ्या टप्यात २ लाख रु. चे  कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.  या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे  १. पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना  पाच आणि पंधरा दिवसीय प्रशिक्षण  दिले जाणार आहे २. पाच ते पंधरा दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे  ३. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच आयडी कार्ड प्रदान केले जाणार आहे ४. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे ई व्हाउचर.  ५. प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह पहिल्या टप्य...

दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज 6 जीबी इंटरनेट साठी ऑनलाइन अर्ज

नुकत्याच दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना OBC, NT आणि SBC समाजातील बॅच 2027 मध्ये JEE/NEET MHTCET परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत मोफत टॅब व त्यासोबत दररोज 6 जीबी इंटरनेट वाटप करण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इयत्ता 10 वी मध्ये प्राप्त मेरिटनुसार लाभ देण्यात येईल. अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता :- 1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी. 2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी. 3. सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरीता पात्र राहतील. 4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. 5. विद्यार्थ्यांची निवड ही इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल. 6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्राम...

राहुरीत शुक्रवारी तब्बल पाच इंच पाऊस

राहुरीत शुक्रवारी  दिवसभरात दोनदा जोरदार पाऊस झाला , सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली .गेल्या तीन ते चार दिवसांपासून राहुरी शहरासह तालुक्यात पावसाची चांगली हजेरी दिसून आली .  तीन दिवसांपूर्वी राहुरीत दोन दिवसात 100 मिलिमीटर पाऊस नोंद झाला होता. शुक्रवारी राहुरीत विक्रमी तब्बल 124 मिलिमीटर ( पाच इंच ) इतक्या पावसाची नोंद सतर्क राहुरी च्या पर्जन्यमापकावर नोंद झाली . गेल्या दोन वर्षातील हा विक्रम मानला जात आहे . राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र व जिल्हा प्रशासनाने देखील शुक्रवारी दुपारनंतर नागरिकांच्या मोबाईल व सोशल मीडिया वर मेसेज पाठवून मुसळधार पावसाचा इशारा दिला होता . गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी शुक्रवारी झालेला पाऊस हा सरासरी ओलांडणारा होता . कालच्या पावसाने अनेक ठिकाणी खरीपची पिके पाण्यात गेली आहे .आठवडाभरात ही दुसरी अतिवृष्टी असल्याने प्रशासनाने खरीप पिकांची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे . शनिवारी देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे .

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा? नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण, किती शेतकऱ्यांना फायदा?

शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे. नमो किसान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण आज करण्यात आलं. शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (Namo Shetkari Yojana) चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण आज करण्यात आलं. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्यासह मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस  आणि अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे , आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या हप्त्याचं वितरण करण्यात आलं.   25 ऑगस्टपर्यंत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन  परळी वैद्यनाथ इथं आजपासून 25 ऑगस्टपर्यंत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात  शेतकऱ्यांना नमो किसान योजनेच्या  चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण करण्यात आलं आहे. परळी व  बीड  जिल्ह्याच्या इतिहासात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होतो आहे. या महोत्सवाचे दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं.  प...

राहिलेल्या बहिणींना तीन हजार रुपये कधी मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत.  याव्यतिरक्त भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत, त्या महिलांची सतत चौकशी होत आहे की आमचे पैसे कधी जमा होणार, याविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे - 1. ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरले आहेत आणि ते फॉर्म अप्रुव झालेले आहेत आणि आधार बँक सिडिंग झालेले आहे त्यांचे पैसे 31 ऑगस्ट पर्यंत खात्यावर जमा होणार आहेत. कधी कधी मोबाईल नेटवर्क कंजेक्षन मुले मोबाइल ला मेसेज येत नाही, अशा वेळी खात्यावरील रक्कम आली की नाही हे तपासून पाहावे. 2. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले आहेत आणि फॉर्म ॲप्रुव झाले आहेत अशा महिलांना सरकार तीन महिन्याचे मिळून 4500 रुपये एकरकमी सप्टेंबर मध्ये जमा करणार आहे.  राहुरी तालक्यातील ज्या महिला फॉर्म भरायचा राहिल्या असतील त्यांनी पांडे कॉम्प्युटर्स (मनोहर कलेक्शन कापड दुकान), छत्रपती शिवाजी महाराज चौक, विद्या मंदिर शाळेजवळ, राहुरी 7020529393 येथे फॉर्म भरावा, या कॉम्प्युटर सेंटर चा 22 वर्षांचा अनुभव आहे. ...

Battery Operated Sprayer Pump : बॅटरी संचलित फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ | महाडीबीटी वर “या” तारखेपर्यंत करता येणार अर्ज

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी महा डिबिटी पोर्टलवर अर्ज करणेबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. सदर बाबीसाठी अर्ज करताना १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु या कालावधीतील ही शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नसलेबाबत निदर्शनास आले आहे. याबाबत MahalT / MahaDBT पोर्टल सुरळीत करणेबाबत सूचित करण्यात आले आहे.  यानुसार सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी "दि. २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.  राहुरी तालक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पांडे कॉम्प्युटर्स, राहुरी 7020529393 येथे अर्ज करावेत, अर्ज करण्यास जाण्याआधी सर्व्हर सुरू आहे का अशी चौकशी मोबाईल नंबर वर करून जावे.

Maharashtra GDS Result 2024 Merit List: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर, गुणवत्ता यादीची DIRECT LINK

भारतीय डाक विभागाचा ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जीडीएस म्हणजेच ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार आता गुणवत्ता यादी तपासू शकतात. गुणवत्ता यादी तपासण्यासाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जावे लागेल. तिथे जाऊन हा निकाल पाहता येईल. इंडिया पोस्टमधील ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2024 रोजी सुरू झाली. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 5 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे ते खाली दिलेल्या पायऱ्यांद्वारे त्यांचा निकाल पाहू शकतात India Post GDS Result: जीडीएस निकाल कसा तपासायचा? निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट- indiapostgdsonline.gov.in वर जा. वेबसाइटला भेट देताच, प्रथम Candidate's Corner वर जा. आता तुमच्या राज्याच्या पुढे दिलेली लिंक क्लिक करा. त्यानंतर पुढील पेजवर तुमच्या सर्कल (Circle) वर जावा. आता निकाल PDF स्वरूपात उघडेल. निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट घेऊ शकत...