Skip to main content

आता आधार कार्डसोबत व्होटिंग कार्ड लिंक गरजेचे, बनावट मतदान रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय.

आता आधार कार्ड सोबत व्होटिंग कार्ड Voting Card Link लिंक करावे लागणार आहे याचा फायदा नक्कीच बोगस मतदान होणे या वर होईल ज्याने जास्तीत जास्त फक्त हयात आणि खरे मतदार एकाच ठिकाणी मतदान करू शकतील ! बनावट मतदान रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय !

आता पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक असले तरी आता मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच मतदान कार्ड असेल, एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मतदान कार्ड असल्यास त्यांची ओळख पटवली जाईल आणि उर्वरित मतदान कार्ड रद्द केले जातील. असा सरकारचा विश्वास आहे.

सरकारने या निर्णयाची नोटीस बजावली आहे. देशाचे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी या आधीच आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती ट्विट करून दिली आहे voting card online application in Maharashtra हे लवकरच सुरु होण्याची शक्यता वर्तवली होती पण आता दि ०१ ऑगस्ट २०२२ पासून आपण आपले मतदान कार्ड हे आधार कार्ड ला लिंक (Voting Card Link) करू शकणार आहात 

या निर्णयामुळे अनेक बनावट मतदान कार्डांना आळा बसणार आहे. एका वृत्तानुसार, कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी एक टेबल शेअर केला आहे ज्यात असे म्हटले आहे की एकदा मतदार यादीची माहिती आधार प्रणालीशी जोडली गेली की, एखादी व्यक्ती ओळखपत्र म्हणून एकापेक्षा जास्त मतदान कार्ड वापरू शकत नाही. ठेवू शकतो निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्‍यासाठी भेट द्या- पांडे कॉम्‍प्‍युटर्स,राहुरी 9850192780