Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरात चर्चा सुरू आहे. अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टनंतरही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आज दिली. गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, १ सप्टेंबरनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये मिळणार नाही." लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? "आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नाही. यापुढेही अर्ज करता येणार आहेत", असे त्या म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? "आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक...