Skip to main content

मोडी लिपीचे ऑनलाईन प्रशिक्षण मोफत घ्या अन् प्रशिक्षण काळात 10,000 स्टायफंडही मिळवा

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्यावतीने मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी 'सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबत विद्यावेतनही मिळणार आहे.

निकष काय?
उमेदवार भराठी, कुणबी असावा. 
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 
नॉन क्रिमिलेअर असावा.
सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
जातीचे प्रमाणपत्र नसल्यास ईडब्ल्यूएस किंवा एसईबीसी प्रमाणपत्र असावे.
उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र जोडावे.

महिन्याला दहा हजारांचे विद्यावेतन
प्रशिक्षण घेणाऱ्या व प्रशिक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी प्रतिमहिना १० हजार रुपयांचे विद्यावेतन
देण्यात येणार आहे. सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २ महिन्यांचा ६० ऑनलाइन तासचा हा अभ्यासक्रम आहे. यात मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे- 
ओरीजनल आधार कार्ड
दहावी मार्कशीट व प्रमाणपत्र
बारावी मार्कशीट
उत्‍पन्‍नाचा दाखला तहसीलदार यांचा 
शाळा सोडल्‍याचा दाखला किंवा टीसी
फोटो

राहुरी तालुक्यातील इच्छुकांनी पांडे कॉम्प्युटर्स (मनोहर कलेक्शन कापड दुकान), छत्रपती शिवाजी महाराज चौक, विद्या मंदिर शाळेजवळ, राहुरी 7020529393 येथे ऑनलाईन अर्ज करावा