Maharashtra GDS Result 2024 Merit List: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर, गुणवत्ता यादीची DIRECT LINK
भारतीय डाक विभागाचा ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जीडीएस म्हणजेच ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार आता गुणवत्ता यादी तपासू शकतात. गुणवत्ता यादी तपासण्यासाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जावे लागेल. तिथे जाऊन हा निकाल पाहता येईल.
इंडिया पोस्टमधील ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2024 रोजी सुरू झाली. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 5 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे ते खाली दिलेल्या पायऱ्यांद्वारे त्यांचा निकाल पाहू शकतात
India Post GDS Result: जीडीएस निकाल कसा तपासायचा?
Merit list of GDS: गुणवत्ता यादी जाहीर-
गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी उमेदवारांची दहावीची गुणपत्रिका पाहिली जाते. इंडिया पोस्ट जीडीएसची मेरिट लिस्ट उमेदवारांच्या 10वीच्या गुणांच्या आधारे तयार करते. इंडिया पोस्टच्या जीडीएसच्या भरतीत अनेक राज्यात मोठी भरती होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पदेही भरली जाणार आहेत. इंडिया पोस्टच्या देशभरातील २३ पोस्टल मंडळांमध्ये ४४ हजार २२८ ग्रामीण डाक सेवक पदे भरणार आहे. याचा नोंदणी कालावधी १५ जुलै ते ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत होता. हा निकाल मंडळनिहाय जाहीर झाला आहे.
- निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट- indiapostgdsonline.gov.in वर जा.
- वेबसाइटला भेट देताच, प्रथम Candidate's Corner वर जा.
- आता तुमच्या राज्याच्या पुढे दिलेली लिंक क्लिक करा.
- त्यानंतर पुढील पेजवर तुमच्या सर्कल (Circle) वर जावा.
- आता निकाल PDF स्वरूपात उघडेल.
- निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट घेऊ शकता.
Merit list of GDS: गुणवत्ता यादी जाहीर-
गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी उमेदवारांची दहावीची गुणपत्रिका पाहिली जाते. इंडिया पोस्ट जीडीएसची मेरिट लिस्ट उमेदवारांच्या 10वीच्या गुणांच्या आधारे तयार करते. इंडिया पोस्टच्या जीडीएसच्या भरतीत अनेक राज्यात मोठी भरती होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पदेही भरली जाणार आहेत. इंडिया पोस्टच्या देशभरातील २३ पोस्टल मंडळांमध्ये ४४ हजार २२८ ग्रामीण डाक सेवक पदे भरणार आहे. याचा नोंदणी कालावधी १५ जुलै ते ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत होता. हा निकाल मंडळनिहाय जाहीर झाला आहे.
अजून पाच ते सहा निवड याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अर्ज केलेल्या उमेदवारांनी वेळोवेळी वरील प्रोसिजर नुसार याद्या तपासत राहाव्यात