Skip to main content

दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज 6 जीबी इंटरनेट साठी ऑनलाइन अर्ज

नुकत्याच दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना OBC, NT आणि SBC समाजातील बॅच 2027मध्ये JEE/NEET MHTCET परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत मोफत टॅब व त्यासोबत दररोज 6 जीबी इंटरनेट वाटप करण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

इयत्ता 10 वी मध्ये प्राप्त मेरिटनुसार लाभ देण्यात येईल.

अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता :-

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.

3. सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरीता पात्र राहतील.

4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.

5. विद्यार्थ्यांची निवड ही इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.

6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.

7. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.

ब. अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)

2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) 

5.10 वी ची गुणपत्रिका

6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट व फी भरण्याची पावती 

7. शाळा सोडल्याचा दाखला

सदर योजनेसाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी पांडे कॉम्प्युटर्स (मनोहर कलेक्शन ) छत्रपती शिवाजी महाराज चौक, विद्या मंदिर शाळेजवळ, राहुरी मोबाईल नंबर 7020529393 यांचे कडून ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा

अंतिम तारीख 31 मे 2025