Skip to main content

Battery Operated Sprayer Pump : बॅटरी संचलित फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ | महाडीबीटी वर “या” तारखेपर्यंत करता येणार अर्ज

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी महा डिबिटी पोर्टलवर अर्ज करणेबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. सदर बाबीसाठी अर्ज करताना १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु या कालावधीतील ही शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नसलेबाबत निदर्शनास आले आहे. याबाबत MahalT / MahaDBT पोर्टल सुरळीत करणेबाबत सूचित करण्यात आले आहे. 

यानुसार सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी "दि. २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 

राहुरी तालक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पांडे कॉम्प्युटर्स, राहुरी 7020529393 येथे अर्ज करावेत, अर्ज करण्यास जाण्याआधी सर्व्हर सुरू आहे का अशी चौकशी मोबाईल नंबर वर करून जावे.